बनेगा करोडपतीच्या १२व्या सीझनमध्ये एक नवा रेकॉर्ड होण्याच्या मार्गावर आहे. आतापर्यंत या सीझनमध्ये तीन करोडपती मिळाले आहेत. तर आता या सीझनमधील चौथा करोडपतीही मिळण्याच्या मार्गावर आहे. आता एक शेतकऱ्याचा मुलगा केबीसीच्या हॉटसीटवर बसला आहे. तेज बहादूर सिंह नावाच्या स्पर्धकाने जबरदस्त खेळ करत ५० लाख रूपये आपल्या नावावर केले आहेत. आधी २५ लाख आणि नंतर ५० लाख रूपये जिंकणाऱ्या तेज बहादूर सिंहला अमिताभ बच्चन १ कोटी रूपयांचा प्रश्न विचारणार इतक्यात हूटर वाजला.