इंदापुर बस्थानक या ठिकाणी सातत्याने प्रवासी वर्गाची मोठी संख्या पाहायला मिळत असते इंदापुर तालुका पुणे सोलापूर जिल्ह्याचा सेंटर पाँइट असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शहरातून गावाकडे गावातून शहराकडे प्रवासी ये जा करीत असतात. इंदापुर बसस्थानकात प्रवासी तोंडाला मास्क न लावता एसटी बसमधून खुलेआमपणाने प्रवास करत आहेत शासनाच्या सोशलडिस्टन्स नियमांचे प्रवासी वर्गाकडून पालन करण्यात येत नाही.सोलापूर कर्नाटक कडून येणाऱ्या बसेस मध्ये सँनिटायझर फवारणी ही इंदापुर आगाराच्या वतीने करण्यात येत नाही बाहेरून येणाऱ्या व जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी इंदापुर आगाराच्या वतीने करण्यात यावी जेणे करून कोरोनाचे वाढते संक्रम कमी करता येईल अशी मागणी नागरी वर्गातून व्यक्त केली जात आहे
बामीदार :-गणेश कांबळे