Monday, January 18, 2021
Home नागरिक व्हिडिओ इंदापूर तालुक्यातील रुई बाबीर देवाची यात्रा रद्द

इंदापूर तालुक्यातील रुई बाबीर देवाची यात्रा रद्द

इंदापुर प्रतिनिधी:-गणेश कांबळे

इंदापुर तालुक्यातील रुई बाबीर देवाची यात्रा दिपावली भाऊबीजेच्या दिवशी सालाबादप्रमाणे भरत असते परंतु सध्या कोरोना महामारीमुळे महाराष्ट्र राज्यातील सर्वच जत्रा -यात्रावर शासनाने सध्या तरी बंदी घातली असून बाबीर देवाचा यात्रा उत्सव यंदाच्या वर्षी रद्द करण्यात आला आहे बाबीर देवाच्या यात्रेसाठी महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेरून लाखोंच्या संख्येनी भाविक भक्त इंदापूर तालुक्यातील रूई बाबीर या ठिकाणी सालाबादप्रमाणे येत असतात

बाबीर यात्रेनिमित्ताने अनेक धार्मिक तसेच विविध वाद्यावर धनगर बांधव मनमोहक गजढोल नृत्य देखील करतात बाबीर देवस्थान हे धनगर समाज्याचे जागृत देवस्थान मानले जाते बाबीर देवाचा उत्सव म्हणजे तालुक्यातील सर्वात मोठा यात्रा उत्सव मानला जातो सध्या कोरोनामुळे गेली ८ महिन्यापासून महाराष्ट्र राज्यातील सर्वच मंदिरे बंद होती आज दि.१६नोव्हेंबर पासून महाराष्ट्र राज्यातील मंदिरे खुले करण्यास शासनाने परवानगी दिली आहे

शासन नियमांचे पालन करून देवाचे दर्शन भाविक भक्तांना घेता येणार आहे महाराष्ट्र राज्यात पुन्हा ऐकदा कोरोनाची लाट येण्याची शक्यता आहे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सालाबादप्रमाणे इंदापुर तालुक्यातील रूई बाबीर देवाची यात्रा रद्द करण्यात आली असल्याची माहिती बाबीर देवस्थानचे ट्रस्ट्रचे अध्यक्ष अजितसिंह पाटिल यांनी दिली आहे बाबीर देवस्थान परिसरात मोठ्या प्रमाणात पोलींसाचा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे ठराविक लोकांच्या उपस्थितीत बाबीर देवाची आरती करण्यात येणार असल्याची माहिती बाबीर देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे

kambleg449
गणेश सुर्यकांत कांबळे पत्रकार इंदापुर तालुका दैनिक तुफान क्रांती इंदापुर माझा न्यूज चँनल प्रतिनिधी इंदापुर

या लेखकाची अन्य पोस्ट