राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या बावडा या गावी आज दि १ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पुणे पदवीधर मतदार संघातील मतदानाचा आपला अधिकार बजावला यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सुशिक्षित मतदार हे महाराष्ट्रातील पदवीधर मतदार संघाच्या ३ /जागा व शिक्षक मतदार संघाच्या २ जागेवर भारतीय जनता पक्षाचाच विजयी होईल असा विश्वास हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी व्यक्त केला