Sunday, March 7, 2021
Home महाराष्ट्र भारत बंदला इंदापुर शहर व ग्रामीण भागात व्यापारी व ग्रामस्थांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारत बंदला इंदापुर शहर व ग्रामीण भागात व्यापारी व ग्रामस्थांचा उस्फुर्त प्रतिसाद

महाराष्ट्र राज्यात केंद्र सरकारन केलेल्या कृषी विधेयकाला विरोध करण्यासाठी विरोधी पक्ष आणि विविध संघटनांनी दिनांक ८डिसेंबर रोजी भारत बंदच आवाहन केलं होत या आवाहनाला पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गावा गावातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला इंदापुर शहरातील व्यापारी वर्गाने स्वयंमस्फुर्तीने दुकाने बंद ठेवून भारत बंदला उस्फुर्तपणे पाठिंबा दिला इंदापुर शहरात अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात आला
इंदापुर बाजार पेठेतील व्यापारी वर्गाने संध्याकाळ पर्यत दुकाने बंद ठेऊन भारत बंद मध्ये सक्रिय सहभाग घेतला भारत बंद दरम्यान इंदापुर शहरात सगळीकडे मोठ्या प्रमाणात शुकशुकाट पाहायला मिळाला ग्रामीण भागात देखील अत्यावश्यक सेवा वगळता भारत बंदला शेतकरी व व्यापारी वर्गाच्या वतीने उस्फुर्तपणे पाठिंबा देण्यात आला
पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने अवजड वाहानांची ये-जा होत असते परंतु आज अगदी मोजकीच अवजड वाहाने राष्ट्रीय महामार्गावर धावताना आढळून आली बावडा व परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने भारत बंदला स्वयंमस्फुर्तीने दुकाने बंद ठेवून पाठिंबा देण्यात आला सरकारनं लादलेले अन्यायकारक कृषी विधेयक रद्द करावे या मागणीसाठी इंदापुरातील विविध राजकीय संघटना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

रिपोर्ट पोस्ट

kambleg449
गणेश सुर्यकांत कांबळे पत्रकार इंदापुर तालुका दैनिक तुफान क्रांती इंदापुर माझा न्यूज चँनल प्रतिनिधी इंदापुर

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी