समाजातील गोरगरीब, वंचित कुटूंबियांची दिवाळी गोड व्हावी, त्यांच्या अंधःकारमय जीवनातील दिपावली सणात आनंदमयी प्रकाश यावा यासाठी लाखेवाडी (ता. इंदापूर) येथील जयभवानी गड विकास प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले व उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी पुढाकार घेत प्रतिष्ठानच्या वतीने या गरीब कुटूंबांना मंगळवारी (दि.10) आनंद भेट चे वितरण करण्यात आले.इथुन पुढे दरवर्षी तीन हजार गरजू गरीब कुटूंबास आनंद भेट देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.