Monday, January 18, 2021
Home इतर ज्येष्ठ अभिनेते विश्व मोहन बडोला यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विश्व मोहन बडोला यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विश्व मोहन बडोला (Vishwa Mohan Badola) यांचे निधन झाले आहे. त्यांचा मुलगा अभिनेता वरुण बडोलाने सोशल मीडिया पोस्टद्वारे वडिलांच्या निधनाची माहिती दिली आहे. विश्व मोहन बडोला यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. वरुणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वडिलांचा फोटो शेअर करत भावूक पोस्ट लिहिली आहे. ‘अनेकजण तक्रार करतात की त्यांची मुले त्यांचे ऐकत नाही. पण अनेकजण हे विसरतात की त्यांची मुले नेहमी त्यांना पाहूनच शिकत असतात. माझ्या वडिलांनी कधीच मला समोर बसवून काही शिकवले नाही. शिकत राहणे हाच जगण्याचा योग्य मार्ग आहे असल्याचे त्यांनी मला शिकवले’ या आशयाची पोस्ट त्याने लिहिली आहे.

https://www.instagram.com/p/CH9gtfBpyAd/?utm_source=ig_web_copy_link

सविस्तर माहितीसाठी :- ndtv | indianexpress | hindustantimes

Web Title: Actor Vishwa Mohan Badola passes away

या लेखकाची अन्य पोस्ट