Monday, January 18, 2021
Home इतर अश्विनी भावेंनी असा साजरा केला ‘वसुंधरा दिन'

अश्विनी भावेंनी असा साजरा केला ‘वसुंधरा दिन’

२२ एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिन म्हणून ओळखला जातो. पृथ्वीविषयीची कृतज्ञता आणि तिच्या संवर्धनाविषयी जनजागृती व्हावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो. सध्या जगावर करोना विषाणूचं संकट आहे. त्यामुळे बऱ्याच देशांमध्ये लॉकडाउन करण्यात आलं आहे. मात्र या काळातही अभिनेत्री अश्विनी भावे यांनी घरी राहूनच हा दिवस साजरा केला आहे. अश्विनी यांना झाडांची विशेष आवड आहे. घरी फावल्या वेळात त्या त्यांचा बराचसा वेळ बागेत, झाडांसोबत घालवत असतात. झाडांची काळजी घेणं, त्यांचं संगोपन करणं हा त्यांचा आवडता छंद असल्यामुळे यंदाचा अर्थ डेदेखील त्यांनी झाडांच्याच संगतीत साजरा केला.

सविस्तर माहितीसाठी :- divyamarathi

या लेखकाची अन्य पोस्ट