Sunday, January 17, 2021
Home इतर ऐश्वर्या व आराध्याला हलका ताप; नानावटी रुग्णालयात केले दाखल

ऐश्वर्या व आराध्याला हलका ताप; नानावटी रुग्णालयात केले दाखल

हलका ताप असल्याने अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन तसेच कन्या आराध्या या दोघींना तातडीने नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महानायक अमिताभ बच्चन व पुत्र अभिषेक बच्चन यांच्यापाठोपाठ ऐश्वर्या व आराध्या यांचा कोरोना चाचणी अहवालही पॉझिटिव्ह आला होता. अमिताभ व अभिषेक यांना लगेचच नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र ऐश्वर्या व आराध्या यांना होम क्वारंटाइन राहण्यास सांगण्यात आले होते. दरम्यान, आज दोघींनाही हलका ताप होता त्यामुळे खबरदारी म्हणून तातडीने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या नानावटी रुग्णालयात दोघींवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | loksatta | ndtv | timesofindia

Web Title : Aishwarya Rai Bachchan, Who Has COVID-19, Moved From Home Isolation To Hospital

या लेखकाची अन्य पोस्ट