नुकताच हाती आलेल्या माहितीनुसार बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याचा ‘भुज: द प्राईड ऑफ इंडिया’ हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. सध्या कोरोनामुळे सर्वच चित्रपटांवर संकट आले आहे. त्यामुळे तयार असलेले चित्रपटही प्रदर्शित होऊ शकत नाही. म्हणूनच आता बॉलीवूडने कोरोनाच्या काळात चित्रपट प्रदर्शनासाठी ओटीटी या माध्यमाचा उपयोग करून घेतला आहे. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित या चित्रपटात अजय देवगणबरोबरच संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा आणि शरद केळकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.
सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes | jagran