Thursday, May 13, 2021

अभिनेत्री ‘आलिया भट्ट’कडून कोरोना रुग्णांसाठी मदतीचा हात पुढे!

देशातील कोरोनाची दुसरी लाट अतिशय धोकादायक (Coronavirus) ठरत आहे. अशातच कोरोना विरुद्ध लढताना देशभरात आरोग्य सुविधांचा तुटवडा निर्माण होत आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक सेलिब्रिटीही मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हीने देखील आपलं समाजभान जपत एक वेगळ्या प्रकारे मदत केली आहे. आलियाने नुकतंच तिच्या ट्विटर अकाऊंटवरून चार टेम्प्लेट शेअर केलेत. यात सध्याच्या कोरोना काळात लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून काम करणाऱ्या सामाजिक संस्थांची माहिती देण्यात आलीये. यामध्ये एकूण चार संस्थांची नावं, कोणत्या सेवेसाठी कार्यरत आहेत ते क्षेत्र, संपर्क क्रमांक, पत्ता अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना नक्कीच मदत होईल.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | ANI

Web Title: Alia Bhatt Excel Entertainment Extends A Helping Hand Amid Covid 19 Crisis 

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी