सध्या कोरोनामुळे सर्वच चित्रपटांवर संकट आले आहे. त्यामुळे तयार असलेले चित्रपटही प्रदर्शित होऊ शकत नाही. म्हणूनच आता बॉलीवूडने कोरोनाच्या काळात चित्रपट प्रदर्शनासाठी ओटीटी या माध्यमाचा उपयोग करून घेतला आहे. त्याचप्रमाणे आता मराठी चित्रपटसुद्धा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा विचार केला जात आहे. ‘परिणती’ हा मराठी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याविषयी निर्णय घेतले जात आहेत. या चित्रपटात अमृता सुभाष, सोनाली कुलकर्णी आणि अक्षर कोठारी हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन अक्षय बाळसराफ यांनी केले आहे.
सविस्तर माहितीसाठी :- loksatta