Monday, April 12, 2021

अनुष्का -विराट यांनी मुलीचा पहिला फोटो केला शेअर

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली (Anushka And Virat) यांनी आपल्या बाळाचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. चाहत्यांमध्ये विरुष्का या नावाने प्रसिद्ध असलेल्या विराट आणि अनुष्का यांनी आपल्या मुलीचे नाव ‘वामिका’ ठेवले आहे. अनुष्काने आपल्या बाळाचा हा पहिला फोटो अविस्मरणीय बनवण्यासाठी त्याला खूप खास कॅप्शन दिले आहे. अनुष्का शर्माने लिहिले की, “आम्ही प्रेम आणि कृतज्ञतेसह एकत्र राहिलो परंतु या छोट्याशा वामिकाने याला नवीन स्तरावर आणले आहे. अश्रू, हसणे, चिंता, आनंद – या भावना आम्ही या क्षणी एकत्र जगलो. आपल्या सर्वांच्या प्रेम आणि प्रार्थनांसाठी आभारी आहोत,” अशा शब्दांत अनुष्काने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | pudhari

Web Title: Anushka And Virat Name Their Daughter

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी