Thursday, May 13, 2021

…म्हणून अभिनेत्री भूमी पेडणेकर हीने मानले चाहत्यांचे आभार!

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला (Coronavirus) आहे. दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या लाखांनी वाढत आहे. हे संकट परतवून लावण्यासाठी भारतात सर्व प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. मात्र तरीदेखील अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. नुकताच अभिनेत्री भूमी पेडणेकरने (Bhumi Pednekar) सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या मावशीसाठी व्हेंटिलेटर बेड हवा असल्याचे सांगितले होते. त्यानंतर अनेक चाहत्यांनी मदत केली आणि मावशीला बेड मिळाला. त्यामुळे भूमीने आपल्या चाहत्यांचे मनापासून आभार मानले आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | navbharattimes | republicworld

Web Title: Bhumi Pednekar Aunt Need Ventilator And Actress Thanks To Twitter Family For Help

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी