Friday, August 6, 2021

जेष्ठ अभिनेते चंद्रशेखर वैद्य यांचं निधन!

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला (Coronavirus) आहे. दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या लाखांनी वाढत आहे. हे संकट परतवून लावण्यासाठी भारतात सर्व प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. मात्र तरीदेखील अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. अशातच हाती आलेल्या माहितीनुसार दूरदर्शनवरील गाजलेली पौराणिक मालिका ‘रामायण’ मधील ‘आर्य सुमंत’ची भूमिका साकारणारे अभिनेते चंद्रशेखर वैद्य (Chandrashekhar Vaidya) यांचं निधन झालं आहे. ते ९८ वर्षांचे होते. मुंबईतल्या अंधेरीमधील राहत्या घरी आज सकाळी ७.१० मिनीटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. 

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | timesnowhindi | loksatta

Web Title: Chandrashekhar Vaidya Aka Ramayan Serial Arya Sumant Passes Away At 98 Years Of Age

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी