छोट्या पडद्यावर प्रचंड गाजत असलेली मालिका म्हणजे ‘स्वराज्यजननी जिजामाता’. या मालिकेमध्ये आतापर्यंत अनेक नवनवीन गोष्टींचा उलगडा झाल्याचं पाहायला मिळालं. त्यासोबतच जिजामातांच्या आयुष्यातील अनेक महत्वपूर्ण टप्पेदेखील या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडले गेले. त्यातच आता या मालिकेत लवकरच डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांची एण्ट्री होणार आहे. विशेष म्हणजे या नव्या भागात ते एका खास भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. 2 सप्टेंबरपासून डॉ. अमोल कोल्हे या मालिकेत एका महत्त्वपूर्ण भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
सविस्तर माहितीसाठी :- divyamarathi
Web Title : Dr. Amol Kolhe Returning To The Small Screen After Eight Months, Will Play A Special Role In Swarajya Janani Jijamata