Monday, January 18, 2021
Home इतर गूढ, थराराने परिपूर्ण अशी कथा; पाहा भूमी पेडणेकरच्या ‘दुर्गामती’चा ट्रेलर

गूढ, थराराने परिपूर्ण अशी कथा; पाहा भूमी पेडणेकरच्या ‘दुर्गामती’चा ट्रेलर

अभिनेत्री भूमी पेडणेकरची मुख्य भूमिका असलेल्या ‘दुर्गामती’ (Durgamati) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भागमती’ या तेलुगू चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात भूमी एका आयएएस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. मात्र चित्रपटाची कथा अत्यंत गूढ व थराराने परिपूर्ण अशी आहे. चित्रपटात भूमीशिवाय अर्शद वारसी, माही गिल, करण कपाडिया आणि जिशू सेनगुप्ता यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘भागमती’चे दिग्दर्शक जी अशोक हेच ‘दुर्गामती’चं दिग्दर्शन करत असून भूषण कुमार, अक्षय कुमार आणि विक्रम मल्होत्रा हे निर्माते आहेत. येत्या ११ डिसेंबर रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर हा चित्रपट प्रदर्शित होईल.

सविस्तर माहितीसाठी :- hindustantimes | news18

Web Title: Durgamati Trailer Released Bhumi Pednekar Arshad Warsi Mahie Gill

या लेखकाची अन्य पोस्ट