Wednesday, June 16, 2021

इंडियन आयडल स्पर्धकाकडून गरीब असल्याचं नाटक? जुने फोटो व्हायरल

सध्या छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो ‘इंडियन आयडल १२’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. शो आता एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. एका स्पर्धकाने शोमध्ये त्याच्या आर्थिक परिस्थितीशी संबंधीत खोटे बोलले असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. ‘इंडियन आयडल १२’मध्ये सहभागी झालेला राजस्थानमधील सवाई भट्ट (Sawai Bhatt) हा स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. पण ऑडिशन दरम्यान त्याने बाहुल्यांचा खेळ दाखवून त्यातून मिळणाऱ्या पैशांनी घर चालवत आहे आणि राहत असलेले घर देखील छोटे आहे असे त्याने म्हटले होते. पण आता सोशल मीडियावर यावर अनेक प्रश्न विचारले जात आहेत. सध्या नेटकऱ्यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये सवाई स्टेजवर परफॉर्म करताना दिसत आहे. त्याचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. एका यूजरने हे फोटो शेअर करत सवाईने इंडियन आयडलमध्ये सांगितलेल्या गोष्टी खोट्या आहेत असे म्हटले आहे. हे फोटोपाहून अनेकांनी शोच्या मेकर्सला देखील प्रश्न विचारले आहेत. पण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | amarujala

Web Title: Indian Idol Fame Sawai Bhatt Old Photos Viral

50% LikesVS
50% Dislikes

हेडलाइन ऑडिटर्स साठी बातमी पडताळणी

आपल्या उद्योगाशी संबंधित अशा बातम्यांचा तुकडा असल्यासारखे वाटते. आपण बातम्यांच्या सत्यतेची पुष्टी करू इच्छिता?
कृपया आपला गुप्त क्रमांक येथे प्रविष्ट करा

उद्योगातील तज्ञ आम्हाला महत्वाच्या बातम्यांच्या पडताळणीसाठी मदत करण्यासाठी बोर्ड बांधत आहेत. आपण स्वत: ला इम्पॅनेल करू इच्छित असल्यास, कृपया येथे क्लिक करा

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी