Friday, February 26, 2021
Home मनोरंजन ‘या’ अभिनेत्रीमुळे इमरान आणि अवंतिकाच्या नात्यात पडली फूट?

‘या’ अभिनेत्रीमुळे इमरान आणि अवंतिकाच्या नात्यात पडली फूट?

अभिनेता आमिर खानचा भाचा इमरान खान (Imran Khan) आणि त्याची पत्नी अवंतिका मलिक गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. इमरान चित्रपटसृष्टीपासून लांब असला तरी त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. अवंतिकाही इमरानची गर्लफ्रेंड होती. अनेक वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण आता त्या दोघांनी घटस्फोट घेतल्याच्या चर्चा रंगल्या आहे. त्या दोघांमध्ये एका अभिनेत्रीमुळे वाद सुरु झाले असल्याचे म्हटले जात आहे. बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, इमरान खान गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्या अभिनेत्री लेखा वॉशिंगटनला डेट करत आहे. अद्याप इमरानने या चर्चांवर वक्तव्य केलेले नाही. लेखा आणि इमरानने ‘मटरु की बिजली का मन डोला’ चित्रपटात एकत्र काम केले आहे. या चित्रपटात लेखाने इमरानच्या मैत्रिणीची भूमिका साकारली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- freepressjournal | timesnownews

Web Title: Is Imran Khan Dating Actress Lekha Washington

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी