Monday, April 12, 2021

कंगनाची रोहित शर्मावर आक्षेपार्ह भाषेत टीका; ट्विट केलं डिलीट

अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी केंद्र सरकारच्या वादग्रस्त तीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. क्रिकेटपटू रोहित शर्मा (Rohit Sharma) यानं देखील यासंदर्भात ट्विट केलं होतं. रोहितच्या ट्विटला उत्तर देताना अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हिनं त्याच्यावर टीका करताना आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्यानं नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘जेव्हाही आपण एकत्र उभं राहिलो आहे, तेव्हा तेव्हा भारत आणखी ताकदवान झाला आहे. काही तरी पर्याय किंवा उपाय नक्कीच काढावा लागेल. आपल्या देशात शेतकरी महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. मला आशा आहे की, आपण सर्व एकत्र येऊन काही तरी उपाय नक्कीच काढू’, असं ट्विट रोहितनं केलं होतं. क्रिकेटपटूंची अवस्था अशी का झाली आहे, ‘ना घर का ना घाट का’. शेतकरी अशा कायद्याविरुद्ध का जातील जो त्यांच्यासाठीच क्रांतिकारी ठरणार आहे. हे दहशदवादी आहेत, जे गोधंळ घालतायत. असं बोलायला भीती का वाटतेय?, अशा भाषेत कंगाननं रोहितला उत्तर दिलं होतं.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | loksatta | timesnownews | crictracker

Web Title: Kangana Calls Cricketers ‘Dhobi Ka Kutta’ After Rohit Sharma Tweets On Farmers’ Protest Matter

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी