Thursday, May 13, 2021

अभिनेत्री कंगनाचे ट्विटर अकाऊंट कायमच बंद!

सतत आपल्या विधानांमुळे आणि बॉलीवूड मधील इतर कलाकारांवर ताशेरे ओढल्यामुळे अभिनेत्री कंगना (Kangana Ranaut) चर्चेत असते. असेच आजही तिच्या नावाची चर्चा आहे मात्र त्याचे कारण आज काही वेगळे आहे. अभिनेत्री कंगनाचे ट्विटर अकाऊंट कायमचे बंद करण्यात आले आहे. खुद्द ट्विटरने ही कारवाई केली आहे. कंगना आपली सर्व मतं ट्विटरच्या माध्यमातून मांडत होती. त्यामुळे तिला अनेकदा इशारा देण्यात आला होता. मात्र तरीही ट्विटरवरून वादग्रस्त विधान करणं तिने बंद केले नाही. नुकताच पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर कंगनाने काही वादग्रस्त ट्वीट केले होते. सोमवारी सायंकाळी कंगनाने केलेल्या या ट्विट्समध्ये अनेक वादग्रस्त आरोप करण्यात आलेले. त्यानंतर आज सकाळी कंगनाचे ट्विटर अकाऊंट कायमचे बंद करण्यात आले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- divyamarathi | lokmat | loksatta | ndtv

Web Title: Kangana Ranaut Twitter Account Has Been Suspended For Violating Twitter Rules

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी