सुप्रसिद्ध कवी मधुकर जोशी यांचं डोंबिवलीत वृद्धापकाळाने निधन झालं. ते ९० वर्षांचे होते. जोशी संत साहित्याचे गाढे अभ्यासक होते. संत साहित्य आणि मानवतावादी कार्यासाठी राज्य सरकारतर्फे दिला जाणारा ‘ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कारा’ने त्यांना गौरविण्यात आले होते. गीतलेखन हा त्यांचा छंद असून या छंदाची तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीदेखील दखल घेऊन त्यांचे कौतुक केले होते. यानंतर माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, विलासराव देशमुख यांनी त्यांचा सत्कार केला होता.
सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes