Tuesday, December 1, 2020
घर इतर आईने कशी शिकवण दिली माहिती नाही, बाप म्हणून माफी मागतो- कुमार सानू

आईने कशी शिकवण दिली माहिती नाही, बाप म्हणून माफी मागतो- कुमार सानू

प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू (Jaan Kumar Sanu) याने ‘बिग बॉस १४’च्या घरात मराठी भाषेविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. मराठी भाषेची चीड येते, असं विधान त्याने केल्यानंतर सर्वच स्तरातून त्याच्यावर टीका झाली. याप्रकरणी कलर्स वाहिनीने, जान सानूच्या आईने आणि स्वत: जान सानूने माफी मागितल्यानंतर आता त्याचे वडील कुमार सानू (Kumar Sanu) यांनी संपूर्ण महाराष्ट्राची हात जोडून माफी मागितली आहे. एका व्हिडीओद्वारे कुमार सानू यांनी मुलाच्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. “गेल्या ४१ वर्षांत मला महाराष्ट्राने आणि मुंबईने खूप काही दिलंय. मुंबईबद्दल किंवा महाराष्ट्राबद्दल मी कुठलीच चुकीची गोष्ट माझ्या मनातसुद्धा आणू शकत नाही. पण माझ्या मुलाने खूप मोठी चूक केली आहे. त्याच्या आईने त्याला कशी शिकवण दिली माहित नाही, पण त्याच्या वडिलाच्या नात्याने मी सर्वांची हात जोडून माफी मागतो. गेले २७ वर्षे तो माझ्यासोबत राहत नाही”, असं ते म्हणाले.

सविस्तर माहितीसाठी :- divyamarathi | headlinehindi

Web Title: Kumar Sanu Apologized For Jaan’s Marathi Statement In A Video

- Advertisment -

ताजी बातमी

महाराष्ट्र : एका दिवसात ३ हजार ८३७ नवीन रुग्णांची नोंद

१६ लाख ८५ हजार १२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #3837newcases

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे ६४६ नवीन रुग्ण

२ लाख ५६ हजार ६३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Mumbai #Coronavirus #646newcases

होउदे खर्च !! मिठीकडे मात्र दुर्लक्ष साफसफाई सह पुनवर्सनाचा प्रश्न जैसे थे

मुंबई : मिठीने अनेक पावसाळे पाहिले. कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगरच्या पुलावरून तर पाणीच पाणी वाहिले. होते नव्हते सारे गेले. संसार तर कित्येक वेळा उघड्यावर पडले....
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel