Friday, August 6, 2021

मंत्री एकनाथ शिंदेबद्दल पोस्ट केल्याने ‘या’ अभिनेत्याला झाली अटक

नुकताच हाती आलेल्या माहितीनुसार मराठमोळा अभिनेता मयुरेश कोटकर (Actor Mayuresh Kotkar) याला ठाणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबद्दल आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आलेच सांगितले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून सध्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर फेसबुकवर पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेता मयुरेश कोटकर याला रविवारी अटक करण्यात आली. न्यायालयीन कोठडीत असलेल्या कोटकर याला अद्याप जामीन मिळाला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सविस्तर माहितीसाठी :- amarujala | latestly

Web Title: Marathi Actor Mayuresh Kotkar Held For Post Against Minister Eknath Shinde

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी