Wednesday, June 16, 2021

सुशांत सिंह राजपूतचा जीवनपट ‘न्याय : द जस्टिस’ लवकरच होणार प्रदर्शित!

दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याने मागच्या वर्षी १४ जून रोजी आत्महत्या केली होती. वर्षभराचा कालावधी उलटून गेला असला तरीही त्याचे चाहते सुशांतला अजून विसरलेले नाहीत. अशातच त्याच्या जीवनावर एक चित्रपट येणार असल्याचे घोषित करण्यात आले होते. मात्र त्याच्या वडिलांनी या गोष्टीला विरोध करत न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र आता न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. ‘न्यायः द जस्टिस’ या चित्रपटात सुशांत सिंह राजपूतच्या खासगी आयुष्यबद्दल खुलासा करण्यात आला असून यात त्याचे नाव, करिअर आणि अनेक गोष्टींमध्ये समानता आहे. यामुळे त्याच्या प्रतिमेवर परिणाम होवू शकतो असे सुशांतच्या वडिलांनी या याचिकेत म्हटले होते. त्यामुळे आता लवकरच ‘न्याय : द जस्टिस’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | divyamarathi | republicworld

Web Title: No Stay On Nyay; Sushant Singh Rajput’s Father KK Singh’s Petition Dismissed By Delhi HC

50% LikesVS
50% Dislikes

हेडलाइन ऑडिटर्स साठी बातमी पडताळणी

आपल्या उद्योगाशी संबंधित अशा बातम्यांचा तुकडा असल्यासारखे वाटते. आपण बातम्यांच्या सत्यतेची पुष्टी करू इच्छिता?
कृपया आपला गुप्त क्रमांक येथे प्रविष्ट करा

उद्योगातील तज्ञ आम्हाला महत्वाच्या बातम्यांच्या पडताळणीसाठी मदत करण्यासाठी बोर्ड बांधत आहेत. आपण स्वत: ला इम्पॅनेल करू इच्छित असल्यास, कृपया येथे क्लिक करा

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी