भारतीय सेनेने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारीत ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर तुफान गाजला होता. हा चित्रपट ११ जानेवारी २०१९मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आज २ वर्ष पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने अभिनेता विकी कौशलने (Vicky Kaushal) त्याच्या आगामी चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित केला आहे. हा पोस्टर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. विकीच्या या आगामी चित्रपटाचे नाव ‘द इम्मॉर्टल अश्वत्थामा’ असं आहे. हा चित्रपट महाभारतातील एका पात्रावर आधारीत असल्याचं म्हटलं जात आहे. हा चित्रपट सायन्स फिक्शन आणि थ्रिलर आहे. विकीने दोन पोस्टर ट्वीट केले आहेत.
सविस्तर माहितीसाठी :- indianexpress | hindustantimes | news18
Web Title: On The 2nd Anniversary Of Uri The Surgical Strike Vicky Kaushal Released The Upcoming Movie The Immortal Ashwatthamas Poster