Saturday, January 23, 2021
Home इतर ‘या’ अभिनेत्रीच्या पतीला जाणवली होती करोनाची लक्षणे, डॉक्टर म्हणाले…

‘या’ अभिनेत्रीच्या पतीला जाणवली होती करोनाची लक्षणे, डॉक्टर म्हणाले…

सध्या संपूर्ण जगात करोना व्हायरसचा फैलाव दिवसेंदिवस वाढत चालला असल्याचे दिसत आहे. भारतात आणि भारताबाहेर देखील करोनाचा संसर्ग अनेक कलाकारांना झाल्याचे समोर आले. आता बॉलिवूड अभिनेत्री श्रिया सरनच्या पतीला देखील करोनाची लक्षणे जाणत असल्याचे समोर आले आहे. सध्या श्रिया स्पेनमध्ये राहत आहे. तिने एका मुलाखतीमध्ये तिच्या पतीला करोनाची लक्षणे जाणवत असल्याचे सांगितले. ‘मी गेल्या एक महिन्यापासून बर्सेलोनामध्ये राहत आहे. करोना व्हायरसमुळे येथे सर्व काही बदलले आहे. आम्ही १३ मार्च रोजी लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलो होतो. तेव्हा सगळीकडे फिरलो पण कोणतेच हॉटेल उघडे नव्हते’ असे श्रियाने म्हटले.

सविस्तर माहितीसाठी :- divyamarathibhaskar | filmfare

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी