सुशांतसिंह राजपूतच्या निधनावर अंकिता लोखंडेने पहिल्यापासून आपलं मत स्पष्ट केलं आहे. बिहार पोलिसांनीही अभिनेत्रीचा जबाब नोंदवून घेतला आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर चाहतेही अंकिताच्या सोशल मीडिया पोस्टवर लक्ष ठेवून आहेत आणि त्यावर कमेन्ट करतात. नुकतंच अंकिताने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. यात तिने एक कोट शेअर करत तिच्या सध्याच्या मनःस्थितीची जाणीव करून दिली. “मी माझ्या मनाचं ऐकते आणि आत्मा जे सांगतं तेच बोलते. मला विकत घेतलं जाऊ शकत नाही आणि कोणी विकूही शकत नाही.” असं तिने पोस्ट मध्ये लिहलं आहे.
सविस्तर माहितीसाठी :- zeenews | indiatvnews | indiatoday
Web Title : Sushant Singh Rajput Ankita Lokhande Instagram Post Says I Can Not Be Brought