Friday, August 6, 2021

सुशांत सिंह राजपूत स्मृतिदिन : अंकिता लोखंडेकडून होम-हवन तर रिया चक्रवतीकडून आठवणींना उजाळा!

दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याने मागच्या वर्षी १४ जून रोजी आत्महत्या केली होती. वर्षभराचा कालावधी उलटून गेला असला तरीही त्याचे चाहते सुशांतला अजून विसरलेले नाहीत. तसेच अजूनही ‘सुशांत सिंह आत्महत्या की हत्या’ या प्रकरणाचा अजूनही तपास लागलेला नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी आहे. मात्र अशातच आज सुशांतच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त चाहत्यांकडून त्याच्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. तसेच त्याची पहिली गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे हीने आपल्या घरात एका होमचे आयोजन करत प्रार्थना केली. तर त्याची दुसरी गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिने तिच्या सोशल मीडियावर सुशांतसोबतचे एक फोटो शेअर करून सुशांत तिच्या आजूबाजूलाच असल्याचे सांगितले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- headlinehindi | abplive | zeenews

Web Title: Sushant Singh Rajput death anniversary Ankita Lokhande shares clip of special prayer at her home, Rhea Chakraborty Share Special Post

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी