सुष्मिताने (Sushmita Sen) २००० साली रेने आणि २०१० साली अलिशा या दोन मुलींना दत्तक घेतलं. विशेष म्हणजे सुष्मिता तिच्या दोन्ही मुलींवर जीवापाड प्रेम करते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रेनेने तिच्या खऱ्या आई-वडीलांविषयी वक्तव्य केलं आहे. एका मुलाखतीत रेनेला तिच्या खऱ्या आई-वडीलांविषयी जाऊन घेण्याची इच्छा आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर रेनेने, “मला याची गरज वाटत नाही. सुष्मिता माझी आई आणि माझे सर्वकाही आहे. माझ्या खऱ्या आई-वडीलांसमोर वाईट परिस्थिती असेल म्हणून त्यांनी असे केले असेल किंवा आणखी काही असेल पण तो भूतकाळ आहे. हे माझं कुटुंब आहे. मी जे काही आहे ते या कुटुंबामुळे आहे. मला जे काही आर्शिवादाने मिळाले आहे ते या कुटुंबात. ज्या मुलांना त्यांच्या खऱ्या आई-वडीलांबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे त्यांचा मी अनादर करत नाही. जर तुम्हाला तुमच्या खऱ्या आई-वडीलां भेटून आनंद मिळत असेल तर तुम्ही नक्की भेटा. पण यामुळे मला आनंद मिळणार नाही” असे उत्तर दिले.
सविस्तर माहितीसाठी :- hindustantimes | timesofindia
Web Title: Sushmita Sen Daughter Renee Reveals Why She Never Want To Found Out About Her Biological Parents