बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनच्या आगामी ‘शेरनी’ (Vidya Balan) या चित्रपटाचं सध्या मध्य प्रदेशमध्ये चित्रीकरण सुरु आहे. मात्र, अचानकपणे हे चित्रीकरण अर्ध्यावर थांबवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेशचे वनमंत्री विजय शाह नाराज झाल्यामुळे हे चित्रीकरण थांबवण्यात आल्याचं ‘टाइम्स नाऊ’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी वनमंत्री विजय शाह यांनी विद्या बालनला डिनरसाठी आमंत्रण दिलं होतं. मात्र, विद्याने हे आमंत्रण स्वीकारलं नाही. त्यानंतर अचानकपणे तिच्या चित्रपटाचं चित्रीकरण थांबवण्याचे आदेश देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्येच विजय शाह नाराज झाल्यामुळे त्यांनी हे चित्रीकरण बंद करण्यास सांगितल्याचं म्हटलं जात आहे. परंतु, विजय शाह यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
सविस्तर माहितीसाठी :- timesnownews | mumbaimirror | india
Web Title: Vidya Balan’s film shooting stopped after actress turns down MP minister’s dinner invite