‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’फेम अभिनेत्री दिव्या भटनागर (Divya Bhatnagar) हिला करोनाची लागण झाली आहे. दिव्याची प्रकृती सध्या नाजूक असल्यामुळे तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. दिव्याच्या आईने ‘टाइम्स ऑफ इंडिया’सोबत बोलताना ही माहिती दिली. नुकतेच तिचे आई व भाऊ मुंबईत आले आहेत. “गेल्या ६ दिवसांपासून दिव्याची प्रकृती खालावली आहे. तिला बरं वाटत नाहीये. दिव्याच्या आजारपणाविषयी समजल्यानंतर मी दिल्लीवरुन घरी आले आणि दिव्याची ऑक्सिजनची पातळी तपासली. त्यावेळी तिची ऑक्सिजनची पातळी अत्यंत कमी झाली होती. सध्या ती व्हेटिलेटरवर असून तिची प्रकृती नाजूक आहे. नुकतेच तिचे रिपोर्ट आले आहेत, ज्यात तिला करोना झाल्याचं स्पष्ट झालं आहे”, असं दिव्याच्या आईने सांगितलं.
सविस्तर माहितीसाठी :- divyamarathi | lokmat
Web Title: Yeh Rishta Kya Kehlata Hai Actress Divya Bhatnagar On Ventilator After Testing Covid 19 Positive