Sunday, March 7, 2021
Home महाराष्ट्र अखेर दहावी आणि बारावीच्या परीक्षांची तारीख सरकारकडून निश्चित!

अखेर दहावी आणि बारावीच्या परीक्षांची तारीख सरकारकडून निश्चित!

संपूर्ण देशात कोरोनाचे सावट असल्याने यावर्षी शैक्षणिक वर्षाच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले. त्यानुसार सर्व प्रकारच्या परीक्षांचे वेळापत्रक देखील बदलण्यात आले. अशातच आता दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या (SSC HSC Exam Date) तारखा सरकारने निश्चित केल्या आहेत. राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी आणि दहावीच्या परीक्षांची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी केली आहे. १२ वीची परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे २०२१ दरम्यान घेण्यात येणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे दहावीची परीक्षा ही २९ एप्रिल ते ३१ मे दरम्यान घेण्यात येणार असल्याचेही गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. 

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | maharashtratimes | lokmat | loksatta

Web Title: 10th Ssc And 12th Hsc Board Exam In Maharashtra Announced By Education Minister Varsha Gaikwad

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी