Monday, April 12, 2021

#INDvsENG : सामन्याआधीच भारताला झटका; ‘हा’ खेळाडू झाला दुखापतग्रस्त!

कोरोना काळानंतर भारतात पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सामना होत आहे. आज पासून म्हणजेच ५ फेब्रुवारी पासून एम. ए. चिदम्बरम (चेपॉक) स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात कसोटी सामना रंगणार आहे. मात्र सामना सुरु होण्याआधीच एक वाईट बातमी भारतीय संघातून मिळाली आहे. बीसीसीआयनं दिलेल्या माहितीनुसार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल (Axar Patel) याला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो पहिल्या कसोटीला मुकणार आहे. अक्षर पटेलऐवजी संघात शाबाज नदीम आणि राहुल चहर या दोन फिरकीपटूंना संघात स्थान देण्यात आलं आहे.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | loksatta | maharashtratimes | lokmat

Web Title: Axar Patel Ruled Out Of First IndvEng Test Shahbaz Nadeem Rahul Chahar Added To India Squad

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी