गलवान खोऱ्यातील (Galwan Valley Clash) रक्तरंजित संघर्षाची घटना अचानक घडलेली नाही. चिनी सैन्याने पद्धतशीरपणे कट रचून भारतीय सैनिकांबरोबर हा हिंसक संघर्ष केला. अमेरिकन आयोगाने काँग्रेसला सादर केलेल्या रिपोर्टमधून हा निष्कर्ष काढला आहे. जून महिन्यात गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक चकमक झाली होती. यात भारताचे २० जवान शहीद झाले तर चिनी सैनिकही ठार झाले होते. भारत-चीनमध्ये नियंत्रण रेषेवर आठ महिन्यांपासून सुरु असलेला सीमावाद मागच्या काही दशकातील गंभीर सीमावाद आहे असे अमेरिका-चीन आर्थिक आणि सुरक्षा आढावा आयोगाच्या अहवालात म्हटले आहे.
सविस्तर माहितीसाठी :- Lokmat | navbharatTimes
Web Title: China Planned Galwan Valley Clash Us Commission Says In Report To Congress