Sunday, January 24, 2021
Home मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवाला अटकेत; एनसीबीची कारवाई

मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवाला अटकेत; एनसीबीची कारवाई

ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून तपास सुरु असून आतापर्यंत अनेक सेलिब्रेटी आणि त्यांच्या संबंधितांची नावं समोर आली आहेत. अनेकांची चौकशीही करण्यात आली आहे. दरम्यान ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून अजून एक अटक करण्यात आली असून मुंबईतील प्रसिद्ध ‘मुच्छड पानवाला’ (Muchhad Paanwala) दुकानाच्या मालकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. एनसीबीकडून सोमवारी रात्री अटकेची कारवाई करण्यात आली. ड्रग्ज प्रकरणात नाव समोर आल्यानंतर एनसीबीकडून सोमवारी त्याची चौकशी करण्यात आली होती. जयशंकर तिवारी यांना ‘मुच्छड पानवाला’ नावाने ओळखलं जातं. अनेक हायप्रोफाइल उद्योजक, सेलिब्रेटी तसंच क्रिकेटर मुच्छड पानवाल्याचे ग्राहक आहेत. ड्रग्ज प्रकरणात ब्रिटीश नागरिक करण सजनानीच्या अटकेनंतर करण्यात आलेल्या चौकशीत मुच्छड पानवाल्याचं नाव समोर आलं होतं. 

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | ndtv | mumbaimirror

Web Title: Co-Owner Of Mumbai’s “Muchhad Paanwala” Chain Arrested In Drugs Case

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी