Monday, April 12, 2021

महाराष्ट्रात कोरोना लसीची टंचाई; सातारा, सांगली, गोंदियासह अनेक ठिकाणी लसीकरण थांबलं!

नुकताच हाती आलेल्या माहितीनुसार; राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या कोरोना लसीचा तुटवडा (Corona Vaccine Shortage) निर्माण झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली जिल्ह्यात कोरोना लसीचा एकही डोस शिल्लक नाही. त्यामुळे लसीकरण पूर्णपणे थांबलं आहे. तर कोल्हापुरातील लसीकरण आज दिवसभरात कधीही ठप्प होऊ शकतं. तर दुसरीकडे विदर्भातील अमरावती, वर्धा, बुलढाणा, गोंदियात सुद्धा लसीचा तुटवडा जाणवतोय. गोंदियातील लसीकरण सुद्धा बंद आहे. इतर जिल्ह्यांमध्ये दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. अशातच पुण्यातही लसीचा साठा कमी असल्याने केंद्राने आम्हाला लस पाठवावी अशी सुप्रिया सुळे यांनी विनंती केली आहे. जर जिल्हा प्रशासनाला कोरोना लसीचा साठा उपलब्ध झाला नाही तर लसीकरण मोहीम अडचणीत येऊ शकते. 

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | lokmat | indianexpress

Web Title: Corona Vaccine Shortage In Maharashtra

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी