गेल्या वर्षी म्हणजेच १२ ऑक्टोबर २०२० रोजी मुंबई आणि ठाण्यातील संपूर्ण वीजपुरवठा बंद पडला (Mumbai Power Cut) होता. अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत हा वीजपुरवठा बंद होता. यामागे परदेशातून झालेला सायबर हल्ला असू शकतो अशी शक्यता ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश सायबर पोलिसांना दिले होते. त्या चौकशीमधून आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील एका वृत्तपत्रात सोमवारी मुंबईतील वीजपुरवठा खंडित होण्यामागे चीनमधून झालेला सायबर हल्ला (China) असल्याचा संशय व्यक्त करणारा अहवाल प्रसिद्ध झाला. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सायबर पोलिसांचा प्राथमिक तपास अहवाल ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना दिला. “मुंबईत वीजपुरवठा बंद पडला त्याच दिवशी सायबर हल्ल्याची शक्यता वर्तवली होती. पण लोकांनी ते हसण्यावारी नेले,” असे राऊत खेदाने म्हणाले.
सविस्तर माहितीसाठी :- divyamarathi | loksatta | lokmat | marathi.abplive | theprint
Web Title: Cyber Intrusion Into Mumbai Power Control System