Friday, August 6, 2021

औरंगाबाद : डॉक्टरची कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्णाकडे शरीरसुखाची मागणी

औरंगाबादमध्ये महापालिकेच्या कोरोना उपचार केंद्रात (Aurangabad Corona) डॉक्टरनं कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्णाकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारानंतर रुग्णाच्या संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात शिरून डॉक्टरला बेदम मारहाण केली. महिलेला शरीरसुखाची मागणी करणाऱ्या डॉक्टरची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महानगरापालिका आरोग्य अधिकारी नीता पडळकर यांनी दिली आहे. पदमपुरा काेविड सेंटरमध्ये मंगळवारी रात्री हा प्रकार घडला. बदनामीच्या भीतीने या महिलेने पाेलिसांत तक्रार देणे टाळले, मात्र मनपाच्या अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली अहे.  डिस्चार्ज देण्याच्या नावाखाली काेराेनाबाधित महिलेला मध्यरात्री केबिनमध्ये बाेलावून घेत त्या डॉक्टरने शरीरसुखाची मागणी केली.

सविस्तर माहितीसाठी :- divyamarathi

Web Title: Demand For Sexual Pleasure From A Coronavirus Positive Woman In Aurangabad

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी