ड्रग कंट्रोलर जनरलकडून आपत्कालिन वापरासाठी मंजुरी मिळाल्यानंतर येत्या 16 जानेवारीपासून देशभरात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधील लसीचे (Serum Vaccines) डोस वेगवेगळ्या भागांमध्ये पोहोचवण्याचे मोठ्या स्तरावर सुरू करण्यात आले आहे. बुधवारी पहाटे याचा पहिला साठा मुंबईमध्ये दाखल झाला आहे. याबाबत मुंबई महापालिकेने सांगितले की, पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट कडून सुमारे 1,39,500 डोस बृहन्मुंबई महानगरपालिकेला उपलब्ध झाले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परळ स्थित एफ/ दक्षिण विभाग कार्यालयात हा साठा पोहोचला आहे.
सविस्तर माहितीसाठी :- pudhari | loksatta | ndtv | thehindu
Web Title: First Batch Of Serum Vaccines Arrive In Mumbai Under Police Cover