Friday, February 26, 2021
Home महाराष्ट्र सीरम इन्स्टिट्यूट आग : ५ जणांचा होरपळून मृत्यू

सीरम इन्स्टिट्यूट आग : ५ जणांचा होरपळून मृत्यू

देशात एकीकडे लसीकरणाची मोहीम सुरु असतांना अचानक एक मोठी बातमी समोर आली. हाती आलेल्या माहितीनुसार आज दुपारी म्हणजेच २१ जानेवारी रोजी दुपारी पुण्यातील ‘सीरम इन्स्टिट्यूटला’ भीषण आग (Serum Institute) लागली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; ज्या ठिकाणी बी सी जी लस बनवली जाते त्या ठिकाणी आग लागली होती. त्यानंतर घटनास्थळी अग्निशामक दलाच्या तब्बल दहा गाड्या उपस्थित झाल्या. सध्या आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले असून या आगीत ५ जणांचा होरपळून मृत्यू (5 Death) झाला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रसारमाध्यांशी बोलताना ही माहिती दिली आहे. तसेच मृत्यू झालेले बांधकाम मजूर असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | divyamarathi | lokmat | loksatta

Web Title: Five Death In Serum Institute Fire In Pune

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी