केंद्र सरकारकडून सोशल मीडियासाठी नियमावली जाहीर!

0
94
सोशल मीडिया

गेल्या काही काळापासून सायबर क्राईमचे प्रकरण अधिक वाढतांना दिसत आहेत. या गोष्टीचा विचार करून केंद्र सरकारने आता याबाबत कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सरकारकडून एक नवीन नियमावली (Social Media Guidelines) तयार करण्यात आले आहे. या नियमावलीनुसार येत्या ३ महिन्याच्या आता कारवाईला सुरुवात होणार आहे.

१) तक्रार निवारण व्यासपीठ आणि अधिकाऱ्याची नेमणूक करावी लागेल. तो तक्रार २४ तासांत नोंद करून घेईल आणि १५ दिवसांत तिचं निवारण करेल

२) जर युजर्सच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचवणारा मजकूर असेल, विशेषत: महिलांच्या, उदा. आक्षेपार्ह छायाचित्रे, असा मजकूर तक्रार दाखल झाल्यापासून २४ तासांत तो काढून टाकावा लागेल

३) भारतात चीफ कम्प्लायन्स ऑफिसर, नोडल कॉन्टॅक्ट पर्सन आणि रेसिडेंट ग्रीव्हन्स ऑफिसरची नियुक्ती करावी लागेल.

४) प्रत्येक महिन्याला तक्रारींचा अहवाल सादर करावा लागेल. महिन्याभरात किती तक्रारी आल्या आणि त्याच्यावर काय कारवाई केली

५) युजर्सचं व्हेरिफिकेशन कोणत्या मार्गाने केलं गेलं, त्याची माहिती द्यावी लागेल

६) जर कुठल्या युजरचा डेटा किंवा ट्वीट किंवा मजकूर हटवला गेला, तर तुम्हाला युजरला सांगावं लागेल आणि त्याची सुनावणी करावी लागेल

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | maharashtratimes | lokmat | loksatta | marathi.abplive

Web Title: Goverment Of India New Guidelines For Social Media In India Announced 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here