हरियाणाचे मंत्री अनिल विज (Anil Vij) शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. 20 नोव्हेंबरला अंबालाच्या एका हॉस्पिटलमध्ये त्यांना तिसऱ्या फेजच्या ट्रायलनुसार को-व्हॅक्सीन डोज देण्यात आला होता. त्यांनी स्वतः सोशल मीडियावर कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. तसेच संपर्कात आलेल्यांना लवकरात लवकर कोरोना टेस्ट करुन घेण्याची मागणी केली आहे. अनिल विज यांनी सोशल मीडियावर माहिती दिली की, ‘माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी अंबाला कँटच्या एका सिव्हिल रुग्णालयात दाखल आहे. तसेच माझ्या संपर्कातील लोकांना लवकरात लवकर कोरोना टेस्ट करुन घ्यावी.’
सविस्तर माहितीसाठी :- pudhari | maharashtratimes | lokmat | loksatta
Web Title: Haryana Health Minister Anil Vij Tested Corona Positive