Thursday, May 13, 2021

आयपीएलवर कोरोनाचे सावट : सर्व सामन्यांचे वेळापत्रक बदलण्याची शक्यता!

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला (Coronavirus) आहे. दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या लाखांनी वाढत आहे. हे संकट परतवून लावण्यासाठी भारतात सर्व प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. मात्र तरीदेखील अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. मात्र दुसरीकडे देशात आयपीएल सारख्या मोठ्या स्पर्धा सुरु आहेत. परंतु; नुकताच हाती आलेल्या माहितीनुसार दिल्ली कॅपिटल्स या संपूर्ण संघाला (Team DC Quarantine) बीसीसीआय कडून विलीगीकरणात राहण्याचे आदेश मिळाले आहेत. आतापर्यंत कोलकाता आणि चेन्नई या संघातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळेच बीसीसीआय लवकरच सर्व सामने मुंबईमध्ये भरवण्याचा विचारात आहे. असं झाल्यास संपूर्ण मालिकेचे वेळापत्रक बदलण्याची शक्यता आहे. लवकरच बीसीसीआय कडून अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

सविस्तर माहितीसाठी :- divyamarathi | maharashtratimes | thehindu | ndtv

Web Title: IPL 2021 BCCI Is Planning To Shift Ipl To Mumbai Schedule Will Be Changed 

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी