Thursday, May 13, 2021

कोल्हापूर : उद्यापासून १० दिवसांसाठी कडक लॉकडाऊन जाहीर!

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला (Coronavirus) आहे. दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या लाखांनी वाढत आहे. हे संकट परतवून लावण्यासाठी भारतात सर्व प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. मात्र तरीदेखील अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. या सर्व परिस्थितीवर कोल्हापूर येथे उद्यापासून पुढचे १० दिवस कडक लॉकडाऊन (Kolhapur Lockdown) लावण्यात आला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी याबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | uniindia | tv9marathi

Web Title: Kolhapur District 10 days Lockdown

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी