ज्येष्ठ समाजसेवक दिवंगत बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे (Sheetal Amte) यांच्या आत्महत्येमुळं राज्यातील सामाजिक वर्तुळ हादरून गेलं आहे. शीतल आमटे- करजगी काही दिवसांपासून मानसिक तणावात होत्या त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असल्याचं बोललं जात आहे. याच संदर्भात अभिनेत्री मयुरी देशमुख (Mayuri Deshmukh) हिनं एक व्हिडिओ शेअर केला आहे. शीतल यांच्या निधनानं माझी वैयक्तिक हानी झाल्याचं मयुरीनं तिच्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.आजही आपल्या समाजात डिप्रेशन, तणावाला गांभीर्यानं घेतलं जात नाही. या विषयावर मी आज बोलणार नाही पण काही साध्या गोष्टी आहेत. तुम्हाला नैराश्य वाटत असेल तर बोला..संवाद साधा. आपण पुरुषांना, मुलांना गृहीत धरतो. त्यांनी रडायचं नाही, सर्व संकटांना एकट्यानं तोंडं द्यायचं. हेच समाजातील मोठ्या व्यक्तींसोबतही होतंयं, बदलायला हवं.
https://www.instagram.com/tv/CIRE-P1gbkY/?utm_source=ig_web_copy_link
सविस्तर माहितीसाठी :- lokmat | loksatta
Web Title: Mayuri Deshmukh Posted Video After Dr Sheetal Amte Suicide