Monday, April 12, 2021

मोदींनंतर शरद पवार यांनी देखील घेतली कोरोना लस!

संपूर्ण देशभरातील कोरोनाचे सावट अजूनही संपलेले नाही. मात्र अशातच आशेचा किरण म्हणजे देशात कोरोना लसीकरण सुरु झाले आहे. आजपासून म्हणजेच १ मार्च २०२१ पासून या लसीकरणाचा दुसऱ्या टप्पा (Corona Vaccine) सुरु झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज पहाटे एम्स रुग्णालयात भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस घेतली. तसेच यावेळी त्यांनी नागरिकांना न घाबरता कोरोना लस घेण्याचे आवाहन केले आहे. अशातच नुकताच हाती आलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीदेखील आज कोरोना लस घेतली आहे. लसीकरणादरम्यान जे.जे. हॉस्पीटलचे डीन तात्याराव लहाणेदेखील पवारांसोबत उपस्थित होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पवारांनी भारत बायोटेकची Covaxin दिली आहे. देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | divyamarathi | lokmat | loksatta

Web Title: Ncp Chief Sharad Pawar Vaccinated In J J Hospital Mumbai 

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी