देशातल्या सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे खासगीकरण ?

0
92
बँक

काही दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी काही महत्वाच्या कंपन्यांचे खासगीकरण होणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर विरोधकांकडून या गोष्टीचा विरोध करण्यात आला. मात्र नुकताच हाती आलेल्या माहितीनुसार; आता देशातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे खासगीकरण (Privatization Of Banks) होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सर्वच क्षेत्रात सरकारनं असण्याची गरज नाही असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) केलं असल्याने बँकांच्या खासगीकरणाची जोरदार चर्चा सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “सर्वच क्षेत्रात सरकारनं असण्याची गरज नाही. व्यवसाय करणं हे सरकारचं काम नाही तर व्यवसायाला सहकार्य करणं ही सरकारची भूमिका आहे.” पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी दिपम Department of Investment and Public Asset Management (DIPAM) विभागाच्या एका कार्यक्रमात बोलत होते.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | marathi.abplive | timesofindia | hindustantimes

Web Title: Privatization Of All Government Banks Pm Modi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here