राज्यात अत्यंत चर्चेत ठरलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाचा निकाल (Pune Graduate Election Result) अखेर जाहीर झाला आहे. या निकालावरून भाजपाला आपला बालेकिल्ला सांभाळता आला नाही हे दिसून आले आहे. कारण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अरुण लाड यांनी भाजपच्या संग्रामसिंह देशमुख यांच्यावर सहज विजय मिळवला आहे. संग्रामसिंह यांना एकूण ४८ हजार ८२४ मते मिळाली आहेत. तसेच अरुण लाड यांना एकूण १ लाख १४ हजार १३७ मते मिळाली आहेत. त्यामुळे या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. अरुण लाड मतमोजणी सुरु झाल्यापासूनच आघाडीवर होते.
सविस्तर माहितीसाठी :- pudhari | divyamarathi | maharashtratimes | lokmat | loksatta
Web Title: Pune Graduate Election Result 2020 : NCP’s Arun Lad Wins Pune Graduate Constituency Election 2020