इराकमधील अमेरिकन दुतावासावर रॉकेट हल्ला!

0
37

नुकताच हाती आलेल्या माहितीनुसार इराकमधील बगदादमध्ये (Iraq Rocket Attack) जोरदार तटबंदी असणाऱ्या ग्रीन झोनमध्ये रॉकेट हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. स्वतः इराकच्या लष्कराने ही माहिती दिली आहे. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरीही वित्त हानी काही प्रमाणात झाली आहे. विशेषतः ग्रीन झोनमधील अमेरिकन दुतावासाला (US Embassy) लक्ष्य करत हा हल्ला करण्यात आला असल्याची माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली आहे. ग्रीन झोनवर तीन रॉकेटच्या सहाय्याने हल्ला करण्यात आला. सध्या स्थानिक लष्कराकडून या प्रकरणाची तपासणी सुरु आहे. ग्रीन झोनमध्ये अनेक देशांचे दुतावास आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- timesofindia | ndtv | news18

Web Title: Rockets Target US Embassy In Iraqi Capital

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here